खळबळजनक!!!!!बारामती लोकसभा मतदारसंघातील “या” गावात लाईट बिल जास्त आल्याने चक्क महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला;उपचारादरम्यान मृत्यू

खळबळजनक!!!!!बारामती लोकसभा मतदारसंघातील “या” गावात लाईट बिल जास्त आल्याने चक्क महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला;उपचारादरम्यान मृत्यू

पुणे

महावितरणाच्या भोंगळ कामकाजावरून सतत सामान्य नागरिक आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत असतात. अनेकदा राग अनावर न झाल्याने कर्मचारी आणि सामान्य नागरिकांमध्ये हाणामारी देखील होते. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाईटचे बिल जास्त आल्याने महावितरण कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना बारामतीत घडली आहे.

बारामती तालुक्यातील मोरगाव येथे महावितरण कंपनी कार्यालयात एका महिलेवर दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. लाईट बिल जास्त येत असल्याने मीटर चेक करावा अशा आशयाची तक्रार महावितरणकडे या आरोपीकडून करण्यात आली होती.

पण महावितरणने कार्यवाही न केल्याने आरोपीने महिला कर्मचाऱ्यांच्या डोक्यात कोयता मारला.या घटनेत महावितरण महिला कर्मचाऱ्याला गंभीर जखम झाली. जीवघेण्या हल्ल्यानंतर सदर महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जखमी महिलेला पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान, महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *