पुणे
पारगाव मेमाणे (ता.पुरंदर) येथे एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरी व इतर चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला मात्र ग्रामस्थ सतर्क झाल्याने त्याठिकाणी चोराना पळवून लावण्यात नागरिकांना यश आले.पारगावमधील वेगवेगळ्या चार ठिकाणच्या एकूण तब्बल 4 लाख 45 हजार रकमेच्या सोन्याचे दागिने व रोख रक्कमेची चोरी झाली आहे.
पारगाव मेमाणे येथे रविवार (दि.28) रोजी फिर्यादी विजय दत्तात्रय गायकवाड हे 11वा.30 मी. वाजता जेवण करून कुटुंबासह घरामध्ये झोपले होते. रात्री तीन वाजता मुलगा वेदांत (वय 8) याला घरात आवाज आल्याने जाग आली.तेव्हा त्याने तोंड बांधलेल्या तीन व्यक्तींना पाहिले, त्यावेळी त्याने मोठयाने ओरडून घरातील इतरांना जागे केले. सर्व जागे झाल्याने चोर पळून गेले.
त्यानंतर घरात येऊन पहिल्या नंतर घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी गेल्याचे समजले. आम्ही सतर्क झालेनंतर गावात इतर लोकांना फोन केले असता समजले दशरथ रघुनाथ मेमाणे, कैलास रघुनाथ मेमाणे आणि आमचे चुलत भाऊ रामदास बबन गायकवाड यांचे घरी देखील रात्रीमध्ये चोरी झाल्याचे समजले.असे फिर्यादी विजय गायकवाड यांनी सांगितले.
चोरट्यानी जालिंदर मेमाणे, अशोक मेमाणे, अजित गायकवाड यांचे घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत नागरिक सतर्क झाल्याने त्याठिकाणी चोरी झाली नाही.
चार ठिकाणी चोरी मध्ये चोरी गेलेला माल पुढील प्रमाणे
1) दागिने आभूषण – 3 लाख रु किमतीचे.
2) रोख रक्कम – 1 लाख 45 हजार रु.
चोऱ्या होत आहेत असे लक्षात आले नंतर जेजुरी पोलीस यांना समजले नंतर रात्रगस्ती साठी असणारे पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे,सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत झेंडे, चालक ढमाळ, हवालदार दशरथ बनसोडे,राहुल माने यांनी या भागात चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र चोर मिळून आले नाही.
सोमवार (दि.29) रोजी पोलिसांनी घटनास्थळ पंचनामे केले. श्वान पथक व फॉरेन्सिक विभागाचे पथक यांना पाचरण करून चोरांचा शोध घेण्याचे काम चालू केले आहे.यावेळी घटना स्थळाला जेजुरी पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सासवड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी भेट देऊन माहिती घेतली.