पुणे
पारगाव,ता.आंबेगाव गावचे हद्दीत कौटमळा येथे आज सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राजाराम कोंडीबा थोरात (वय-६५ वर्षे) रा. पारगाव (कौटमळा),ता.आंबेगाव यांनी शेतात लिंबाचे झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली आहे.
पारगाव कारखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व तुषार निवृत्ती थोरात यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली कि खबर दिली की, आज सोमवारी सकाळी चुलते राजाराम कोंडीबा थोरात हे पुणे येथुन गावी आले दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मी घरी असताना मला लोकाकडुन समजले की, राजाराम कोंडीबा थोरात यांनी त्यांचे शेतात लिबांच्या झाडाला फाशी घेतली आहे.
तेव्हा मी लगेच शेतात गेलो असता तेथे लोंकाची गर्दी झालेली होती. त्यावेळी कोणीतरी पोलीसांना फोन केला पोलीस आले. नंतर त्यांना झाडाचे सोडुन खाली घेतले व रुग्णवाहिकेमध्ये घालुन उपजिल्हा रूग्णालय मंचर येथे घेवुन गेलो असता डाँक्टरांनी राजाराम कोंडीबा थोरात हे मयत झाले असल्याचे सांगितले.
पारगाव कारखाना पोलिसांनी आत्महत्तेचा गुन्हा दाखल केला असून आत्महत्तेचे कारण समजले नाही पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे करत आहे.