खळबळजनक !!!!!!                           कुऱ्हाडीने डोक्यात वार,हाताचे बोट निकामी; भर ग्रामसभेत महिला “सरपंचावर” जीवघेणा हल्ला

खळबळजनक !!!!!! कुऱ्हाडीने डोक्यात वार,हाताचे बोट निकामी; भर ग्रामसभेत महिला “सरपंचावर” जीवघेणा हल्ला

पुणे

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील लोहगांवच्या महिला सरपंच शारदा प्रकाश आडे यांच्या ग्रामपंचायतीची सभा सुरू होती. यादरम्यान उपसरपंच, सचिव आणि इतर सदस्यांसमोर गावातील ४ जणांनी आडे यांच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.शारदा आडे ह्या डिसेंबर २०२२ मध्ये लोहगावच्या सरपंच म्हणून जनतेतून निवडून आल्या होत्या.

निवडून आल्यापासूनच गावाच्या विकासासाठी त्यांनी नवनवीन उपक्रम राबवायला सुरूवात केली होती. नुकतेच त्यांनी गावातील अतिक्रमण काढण्यासाठी नियोजन सुरू केले होते. या संदर्भात आज ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर गावातील काही तरुणांनी गोधळ घालायला सुरवात केली. त्यांना रोखण्यासाठी सरपंच, उपसरपंच प्रयत्न करत होते.

त्यानंतर बाचाबाचीचे भांडणात रूपांतर झाले. वादातून चार तरुणांनी महिला सरपंचावर थेट कुऱ्हाडीनेच हल्ला चढवला. कुऱ्हाडीच्या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली असून डाव्या हाताचे बोट निकामी झाले आहे. त्यांच्यावर सध्या अकोला सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

थेट महिला सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.जीवघेण्या हल्ल्यातील आरोपी अरविंद नामदेव राठोड, नामदेव शिवराम राठोड, सुनील नरेंद्र राठोड आणि सहादेव जगराम राठोड या चौघांवर कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एका आरोपीचा कारंजा ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत.

ग्रामसभेत अतिक्रमण संदर्भातील मुद्दा चर्चेला येणार असल्याची पूर्व कल्पना असल्याने आरोपी तयारीनिशी ग्रामसभेत गेल्याची माहिती समोर आहे. या हल्ल्याला निवडणूक झालेल्या पराभवाची किनार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. कारण निवडणूक झाल्यापासून हे युवक सातत्याने ह्या सरपंचानी सुचविलेल्या कामाला विरोध करत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *