सोलापूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा, अशी मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. रोहित पवारांच्या या मागणीला काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कडक शब्दांत उत्तर दिलं आहे.रोहित पवारांची आमदारकीची पहिली टर्म आहे, काहींमध्ये पोरकटपणा असतो, अशी टोकदार टीका प्रणिती शिंदेंनी केली.
त्यामुळे सोलापूरच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु झाल्याचं चित्र आहे.सोलापूर लोकसभेसंदर्भात रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारलं असता, प्रणिती शिंदे यांनी म्हटलं की, कोण रोहित पवार? म्हणत त्यांच्या वक्तव्याला किंमत न देण्याचा प्रयत्न केला. आमदारकीची त्यांची ही पहिलीच टर्म आहे. काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या, त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं.