कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक, सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर दणदणीत विजय

कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक, सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर दणदणीत विजय

पृथ्वीराज चव्हाण, विश्वाजित  कदमांचे मनसुबे धुळीला

सातारा

कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक, सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर दणदणीत विजय, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदमांचे मनसुबे उधळले 

सातारा : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत डॉ. अतुल भोसलेंच्या सत्ताधारी सहकार पॅनेलचा दणदणीतविजय झाला आहे. या सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर विजय झाला असून भाजपाच्या डॉ. अतुल भोसलेंकडून  कारखाना हिसकावून घेण्याचे दोन्ही काँग्रेस नेत्यांचे मनसुबे कृष्णेच्या सभासदांनी उधळून लावले आहेत.

जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर विजय

कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 29 जून रोजी पार पडली. त्यावेळी तब्बल 34532 सभासदांनीमतदान केले होते. आता या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. मतमोजणीचा निकाल जाहीर झाला आहे. यानिवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांच्या सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने सर्व 21 जागांवर दहा हजारांच्यामताधिक्याने विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून सहकार पॅनेलचे उमेदवार आघाडीवर असल्यामुळेदुपारपासूनच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष सुरु केला होता. रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती. आता निकाल स्पष्ट झाले आहेत.

तिरंगी लढत, पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजित कदमांचे प्रयत्न फोल

सातारा-सांगली जिल्ह्यात 47145 सभासद असणाऱ्या कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यानिवडणुकीत भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांच्या सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने दणदणीत विजयीमिळवला. या निवडणुकीत मिळालेलं मताधिक्य आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त आहे. या कारखान्याची सत्ताभोसले गटाकडून दुसरीकडे जावी म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व विरोधक एकत्र आणण्यासाठीप्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली. माजी चेअरमन अविनाश मोहिते यांचेसंस्थापक पॅनेल आणि राज्यमंत्री विश्वजित कदम नेतृत्व करत असलेले रयत पॅनेल अशी आणखी दोन पॅनल रिंगणातआल्याने या निवडणुकीची चर्चा झाली.

निकालाचे विधानसभा निवडणुकीवर पडसाद

या निवडणुकीमुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले होते. या निवडणुकीतमतदानही विक्रमी झाले. दिग्गजांचे विधानसभा मतदारसंघ या कार्यक्षेत्रात येत असल्याने सगळ्याच नेत्यांचे लक्ष यानिवडणुकीकडे होते. मात्र भोसले गटाने मोठ्या फरकाने इतरांचा पराभव करत कृष्णाची सहकारी साखर कारखान्याचीसत्ता पुन्हा एकदा मिळवल्याने आता विरोधकांची चिंता वाढली आहे. या निवडणुकीचे पडसाद आगामी विधानसभानिवडणुकीवर पडणार हे निश्चित असल्याचे मानले जात आहे.

सहकारी संस्थेत राजकारण बाजूला ठेवण्याचा संदेश दिला

दरम्यान, या विजयानंतर बोलताना, “ही निवडणूक ऐतिहासिक झाली असून सभासदांनी दिलेल्या मोठ्या मताधिक्‍यामुळेजबाबदारी वाढली आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहणे गरजेचे आहे. या निवडणुकीत अनेकराजकारणी पडले होते. सहकारी संस्थेत राजकारण बाजूला ठेवण्याचा संदेश या निवडणुकीने दिला,” अशी प्रतिक्रियासत्ताधारी सहकार पॅनलचे प्रमुख व चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली

शेतकरी सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणार

तसेच कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त कृष्णा सहकारी साखर कारखाना राजकारणाचा अड्डा बनवण्याचे षड्यंत्रअनेक राजकारण्यांचं होतं. मात्र सुज्ञ सभासदांनी तो डाव उधळून लावला असून यापुढील काळात शेतकरी सभासदांच्याअपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया विजयानंतर डॉ अतुल भोसले यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *