कु.ज्योत्स्ना रामभाऊ सोलणकर यांचा राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन गौरव

कु.ज्योत्स्ना रामभाऊ सोलणकर यांचा राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन गौरव

बारामती – कल्पना जाधव प्रतिनिधि बारामती

ज्योत्स्ना सोलणकर माळेगावातील रहिवासी असून बारामतीमध्ये ब्युटीशियन व्यवसाय क्षेत्रात जे. एस. मेकओव्हर या त्यांच्या सलून(होम सर्व्हिस)मध्ये देत असलेल्या आपल्या प्रामाणिक कामामुळे प्रसिद्ध आहेत.त्या करत असल्यालेल्या गोरगरिब जनतेच्या मदतीसाठी सामाजिक,वैद्दकिय कार्यामुळे समाजात धडाडीची कार्यकर्ती म्हणून ओळखल्या जातात.

त्यांची नुकतीच शिवसेना बारामती तालुका विभाग प्रमुख म्हणून निवड झाली आहे.
महिलांमध्ये सकारात्मक विचार रुजवून अंधश्रद्धा निर्मुलनाचे,सक्षमीकरणाचे त्यांचे काम खूप छान पद्धतीने चालू आहे.त्यांच्या आधारामुळे खूप काही महिला सक्षम आहेत.

समाजकार्य या आवडत्या क्षेत्रामध्ये त्या गेले 5ते6वर्षे कार्यरत आहेत.सामाजिक,तसेच वैद्दकिय,आद्ध्यात्मिक सेवेमध्ये तसेच व्यसनमुक्त संघ महाराष्ट्र राज्य स्वयंसेविका म्हणून काम करत आहेत.

राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, लातूर जिल्हा
याचे संस्थापक अध्यक्ष श्री. बालाजी जाधव सचिव श्री. विशाल देवकाते व महिला आघाडी अध्यक्षा कल्पना ताई जाधव काटकर बारामती यांनी कु. ज्योत्स्ना ताई रामभाऊ सोलणकर यांच्या कामाची दखल घेतली व त्यांना गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *