काळीज पिळवुन टाकणारी घटना!!!!!!   परीक्षेला जाताना डंपरने चिरडलं,तिघे बहिण-भाऊ जागीच ठार

काळीज पिळवुन टाकणारी घटना!!!!!! परीक्षेला जाताना डंपरने चिरडलं,तिघे बहिण-भाऊ जागीच ठार

पुणे

छत्रपती संभाजीनगरमधून एका मोठ्या अपघाताची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजी नगर शहरातील बाळापूर फाट्यावर हायवा आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तिघा भाऊ- बहिणींचा जागीच मृत्यू झाला.

काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहेछत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेलसमोर सकाळी (८ फेब्रुवारी) भीषण अपघात झाला.

दोन भरधाव हायवांनी ओव्हरटेक करण्याच्या नादात एका दुचाकीला चिरडले. या दुर्घटनेत परीक्षेला जाणाऱ्या तिघे बहिण-भाऊ जागीच ठार झाले. या भयंकर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृतांची नावे आहेत. ते वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील होते. मृतांजवळ वन विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकीट सापडले. यावरून ते परीक्षा देण्यासाठी जात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *