पुरंदर
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नारज उमेदवारांची ठिकाणावरून नाराजी समोर येत आहे. यातच आज सासवड (ता पुरंदर) येथेल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने उमेदवारी न मिळाल्याने स्वतः गळ्यात हार घालून बैला सोबत ढोल-ताशांच्या निनादात मिरवणुकीत सहभाग नोंदवून आपली नाराजी व्यक्त केली.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांच्यात आघाडी आहे. मात्र यात काँग्रेस ला एकच जागा दिली. सर्वसाधारण च्या जागेवर मात्र संधी न दिल्यामुळे आपण दोन्ही पक्षांशी प्रामाणिक असतानाही आपल्याला मानहानीला सामोरे जावे लागले. आज बैल पोळा हा सण आहे. बैल वर्षभर शेतकऱ्याशी प्रामाणिक असतो. तसेच मी दोन्ही पक्षाशी प्रामाणिक असतानाही हा माझ्या वर अन्याय झाला. असल्यामुळे मी माझ्या एका बैला बरोबर बैल होऊन त्याच्या बरोबर गळ्यात हार घालून ढोल-ताशांच्या निनादात मिरवणुकीत सहभाग नोंदवण्याचे पसंत केले. नंदकुमार जगताप,मा.सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती निरा.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला एक भटक्या विमुक्त जाती/ जमाती विशेष मागास प्रवर्ग ही आरक्षीत जागा मिळाली. ५ नंबर गटातील सर्वसाधारण जागेवर मात्र राष्ट्रवादी ने सर्व उमेदवार उभे केल्याने वीस वर्ष पासून काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर आपण प्रामाणिक काम करीत असताना. डावलण्यात आले असल्याच्या नाराजी मुळे स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केलेले नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नंदकुमार मल्हारी जगताप यांनी बैल बनुन घरच्या बैला बरोबर मिरवणुकीत सामील होऊन वेगळ्या पद्धतीने नाराजी व्यक्त केली.