“करुन करुन भागले अन देवपुजेस लागले”अशा मनोहर भोसलेचा जीवनप्रवास

“करुन करुन भागले अन देवपुजेस लागले”अशा मनोहर भोसलेचा जीवनप्रवास

पुणे

स्वतःला बाळूमामांचा अवतार समजणारा मनोज ऊर्फ मनोहरमामा भोसले याच्यावर लोकांची दिशाभूल करणे, फसवणूक, बलात्कार यांसह त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असून या भोंदूला १० सप्टेंबर रोजी लोणंद येथील एका फार्म हाऊसवर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले.

डीएड करूनही नोकरी मिळत नसल्याने मनोजने आसपासच्या गावांत भाजीपाला, सुकट बोंबील विकून गुजराण करण्यास सुरुवात केली. मात्र, एके दिवशी आपल्याला बाळूमामाचा साक्षात्कार झाल्याचे सांगून या मनोजचा रातोरात मनोहर मामा झाला. बाळूमामानंतर मनोहरमामा एक दैवी शक्ती आहे, असे भासवून गर्दी जमविण्यास यशस्वी झाला. अखेर त्याच्या या नाट्यमय घडामोडींनंतर त्याचा खरा चेहरा लोकांसमोर आला.

मनोहर भोसले हा मूळ इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावचा असून त्याचे आईवडील हे उदरनिर्वाहासाठी इंदापूर तालुक्यातून उंदरगाव येथे आले होते. सुरवातीच्या काळात तो उंदरगाव आणि आसपासच्या परिसरात भाजीपाला आणि सुकट बोंबील विकण्याचे काम करत होता.

एके दिवशी आपल्याला बाळूमामा प्रसन्न झाले असल्याचं सांगून मनोहर याने उंदरगावच्या कांबळे वस्तीत बाळूमामांच्या नावानं लोकांचे भविष्य पाहण्यास सुरुवात केली. मात्र, तेथील लोकांशी त्याचे सुत न जुळल्याने त्याने हा उद्योग आत्ता उभारलेल्या मठाशेजारील एका शेतात सुरू केला. अगदी सुरुवातीच्या काळात उंदरगाव आणि परिसरातील अनेक लोक आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी त्याच्याकडे जात असत.

त्यानंतर, उंदरगाव येथे प्रतिसाद मिळत नसल्याचे बघून त्याने दौंड तालुक्यातील गिरीम येथे काही दिवस हाच उद्योग केला दरम्यान तेथे त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने. त्याने आपली मोर्चेबांधणी बारामती तालुक्यातील गोजुबावीकडे केली, परंतु तिथेही त्याचे दुकान न चालल्याने त्याने उंदरगाव येथेच आपले बस्तान बसविले. आणि डीएडचे शिक्षण झालेल्या मनोहरने बघता बघता शहरी आणि बड्या लोकांच्या मनात स्थान निर्माण करून लोकांचा विश्वास संपादन केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *