आश्चर्यजनक!!!!!!! इंटरनेटवर ओळख, लग्नाच्या आमिषाने पुण्यात तरुणीला घातला लाखोंचा गंडा

आश्चर्यजनक!!!!!!! इंटरनेटवर ओळख, लग्नाच्या आमिषाने पुण्यात तरुणीला घातला लाखोंचा गंडा

पिंपरी चिंचवड

इंटरनेटवर ओळख झाल्यावर विश्वास संपादन करुन जवळपास 50 महिलांना फसवणाऱ्या ठकाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली असताना त्याच पद्धतीने चिखली परिसरात राहणाऱ्या आणखी एका महिलेला लुबाडले गेल्याची घटना समोर आली आहे. महिलेची पावणेदोन लाख रुपयांना फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

संबंधित महिलेची ओळख अशाच एका साईटवर 40 वर्षीय व्यक्तीशी झाली. त्याने तिचा विश्वास संपादन करत लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याकडून पावणे दोन लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम नेली.

त्यानंतर महिलेसोबत विवाह न करता तिची फसवणूक केल्याचा आरोप आहे. किरण कालिदास पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *