आपल्या सोयीसाठी दोन उपमुख्यमंत्री निवडले,महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मध्ये दोन उपसरपंच निवडीची तरतूद करा;पुणे जिल्ह्याच्या “या” गावच्या माजी सरपंचांनीच लिहिले थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

आपल्या सोयीसाठी दोन उपमुख्यमंत्री निवडले,महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मध्ये दोन उपसरपंच निवडीची तरतूद करा;पुणे जिल्ह्याच्या “या” गावच्या माजी सरपंचांनीच लिहिले थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे

महाराष्ट्र राज्यात सध्या सरकारने आपल्या सोयीसाठी दोन उपमुख्यमंत्री निवडले असून तशाच प्रकारे महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत मध्येही दोन उपसरपंच निवडून बाबत शासन स्तरावर तात्काळ विचार व्हावा.अशा मागणीचे पत्र भाऊसाहेब पांडुरंग मरगळे मा.आदर्श सरपंच वेगरे,तालुका मुळशी,जिल्हा पुणे यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना दिले आहे.


ग्रामीण भागातील प्रत्येक गावागावातही अनेक गट असतात. त्या गटापैकीच अनेक जण ग्रामपंचायत सदस्य म्हणून वेगवेगळ्या पॅनल मधून निवडून आलेले असतात. ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर प्रत्येकाला सरपंच किंवा उपसरपंच पद मिळावे अशी अपेक्षा सर्वांचीच असते.

त्यातच सरपंच पद राखीव असले तर इतरांना म्हणजे सर्वसाधारण खुले सदस्यांना संधी मिळत नाही. त्यातून अनेक जण नाराज होतात. सदस्यांची फोडाफोडी होते व काही वेळा सदस्यांची पळवा पळवा देखील होते. तर काही वेळेला आर्थिक गैरव्यवहार देखील होतो.

त्यातूनच गाव पातळीवर मोठा तणाव निर्माण होऊन वाद विकोपाला जातो त्यामुळे दोन गटात भांडणे होतात व त्याचे दुष्परिणाम गावचे विकासावर तर होतातच व गावात देखील राजकीय वातावरण दूषित होते.

त्यामुळे शासनाने दोन उपमुख्यमंत्र्यांप्रमाणेच दोन उपसरपंच निवडण्याची तरतूद केली तर आणि ग्रामपंचायत सदस्यांना पाच वर्ष कालावधीत उपसरपंच होण्याची संधी मिळेल. व सर्वांना आपल्या मर्जीप्रमाणे ग्रामविकासात योगदान देता येईल.


या संदर्भात शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन परिपत्रक काढावे त्याची अंमलबजावणी करावी अशी विनंती वेगरे गावचे मा. आदर्श सरपंच भाऊ मरगळे यांनी केल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *