मुंबई
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे सरकारने सर्वसामान्यांसाठी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेतले.
त्यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे आता वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत करण्यात आला. या निर्णयांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
शिंदे सरकारच्या नव्या निर्णयानुसार, आता वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून मोफत प्रवास करता येईल.