आधी “या” तरुणाशी लग्न केले ; हनीमूनही केला आणि त्यानंतर पावणेचार लाख घेऊन नववधू झाली फरार !!!!!

आधी “या” तरुणाशी लग्न केले ; हनीमूनही केला आणि त्यानंतर पावणेचार लाख घेऊन नववधू झाली फरार !!!!!

कोल्हापुर

मराठवाडय़ातून आलेल्या एका तरुणीने बाभळेश्वर येथील तरुणाशी लग्नही केले, हनीमूनही केला आणि विश्वास संपादन करून तीन लाख 70 हजार रुपये घेऊन पोबाराही केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

याप्रकरणी लोणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संबंधित तरुण मामाकडे राहून मोलमजुरीचे काम करायचा. सध्या लग्नासाठी मुली मिळत नसल्याने गावागावात अनेक अविवाहित तरुण दिसत आहेत. संबंधित तरुणाला मात्र बायको मिळाली.

अश्विनी (रा. हेळस, जि. जालना) ही तरुणी आणि तिची मावस बहीण रूपा यांचा संबंधित तरुणाशी संपर्क झाला. अश्विनीशी त्याचा विवाह ठरला आणि बाभळेश्वर येथे 4 एप्रिल रोजी लग्नही झाले. लग्नानंतर ते कोल्हापूरला हनीमूनला गेले. दोन-चार दिवस त्यांचे मजेत गेले.

मात्र, 30 एप्रिल रोजी कोल्हापूरच्या बस स्थानकावरून अश्विनी आणि रूपा पसार झाल्या. जाताना त्यांनी लग्नासाठी केलेले 70 हजार 915 रुपयांचे दागिने आणि तीन लाख रुपयांची रोख रक्कमही नेली.

आपला विश्वास संपादन करून फसविण्यात आल्याने संबंधित तरुणाने लोणी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

दरम्यान, अनेकजण पैसे देऊन इतर जिह्यातील मुलींशी विवाह करीत आहेत; परंतु लग्नाच्या नावाखाली आर्थिक लुबाडणूक करणाऱया काही टोळ्या याचा फायदा उठवीत असून, सावध, सतर्क आणि डोळसपणे या गोष्टी करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *