आईवर विळ्यानं हल्ला होताना धाकट्याला नाही बघवलं; थरारक घटनेत थोरल्याचा खेळ खल्लास

आईवर विळ्यानं हल्ला होताना धाकट्याला नाही बघवलं; थरारक घटनेत थोरल्याचा खेळ खल्लास

बीड

थोरल्या भावाची हत्या करून त्यानं आत्महत्या केल्याचा बनाव रचणाऱ्या भावाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक सत्य समोर आलं आहे.

थोरल्या भावाची हत्या करून त्यानं आत्महत्या केल्याचा बनाव रचणाऱ्या भावाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक सत्य समोर आलं आहे. थोरला भाऊ आपल्या आईवर विळ्यानं हल्ला करत असल्याचं पाहून धाकट्या भावानं थोरल्या भावाची निर्घृण हत्या केली आहे. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धाकट्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. या हत्या प्रकरणात भावाला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.

बापू ऊर्फ बाळासाहेब कदम असं हत्या झालेल्या थोरल्या भावाचं नाव आहे, तर गणेश कदम असं अटक केलेल्या धाकट्या भावाचं नावं आहे. दोघंही माजलगाव तालुक्यातील मालीपारगाव याठिकाणी आपल्या आई वडिलांसोबत राहतात. दरम्यान घरगुती कारणातून थोरला भाऊ आईवर विळ्यानं हल्ला करत होता. आईला होणारी मारहाण न बघवल्यानं धाकट्यानं थोरल्या भावाची पाठीमागून येऊन गळा आवळून हत्या केली आहे. यानंतर आरोपी भावानं मृत भावाचा मृतदेह घराच्या पाठीमागे ओसाड जागेत फेकून दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *