आंबळे हायस्कुलच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मंगेश गायकवाड

आंबळे हायस्कुलच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मंगेश गायकवाड

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागात असणार्या आंबळे येथील श्री शिवाजी विद्यामंदिर या हायस्कुलच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मंगेश गायकवाड यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे.

आजपर्यंत शेक्षणिक कार्य करताना मंगेश गायकवाड यांनी मागील सात ते आठ वर्षात आंबळे येथील हायस्कुलवर विषेश होते.

मागील वर्षी दहावीचा निकाल हा १०० टक्के लागला होता. याही वर्षी शाळेचा निकाल हा शंभर टक्के लागावा यासाठी विद्यार्थी व शिक्षकांत समतोल साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे व विद्यार्थ्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश गायकवाड यांनी सांगीतले.

मंगेश गायकवाड यांनी यापुर्वी आंबळे ग्रामपंचायतचे सरपंच पद भुषविलेले असुन ते सध्या पुरंदर तालुका पत्रकार संघाचे सहसचिव व पुरंदर तालुका सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीचे सदस्य असुन संजीवनी न्युज चे कार्यकारी संपादक आहेत.

यावेळी व्यवस्थापन समिती उपाध्यक्षपदी योगीता दरेकर यांची निवड करण्यात आली तर शिक्षक-पालक संघाच्या अध्यक्षपदी प्रदिप जगताप तर उपाध्यक्षपदी मदिना इनामदार यांची निवड करण्यात आली.

आंबळे गावचे उपसरपंच सचिन दरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सभेचे सुत्रसंचालन जितेंद्र अवताडे यांनी केले तर आभार सुनिल हैंद्रे यांनी मानले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका निना चव्हाण यांबरोबर शिक्षक सुनिल हैंद्रे,जितेंद्र अवताडे,शरद आव्हाड,माऊली घाडगे,श्रद्धा भट्टी,स्मिता शेळके तसेच तुषार दरेकर,डॉ. कुडिया,प्रमोद दरेकर,राजेंद्र बधे,विजय दरेकर,संतोष खोमणे,बाबाजी बिचकुले,दत्ता कुंजीर यांसह असंख्य पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *