आंबळे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा !!!!!                     पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या तालुका संघटकपदी जितेंद्र अवताडे यांची बिनविरोध निवड

आंबळे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा !!!!! पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या तालुका संघटकपदी जितेंद्र अवताडे यांची बिनविरोध निवड

पुरंदर

पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी निवड सभा पुरंदर हायस्कुल अँड ज्युनियर कॉलेज सासवड याठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

सदर नूतन कार्यकारीणी निवडप्रक्रियेचे कामकाज जिल्हा निरीक्षक पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे कोषाध्यक्ष सन्माननीय श्री.किशोर दरेकर व हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री.दिलीप थोपटे यांनी पाहिले.

तसेच निवडसभेच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सन्माननीय श्री.वसंतराव ताकवले तर पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष सन्माननीय श्री.तानाजीराव झेंडे,पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे प्रवक्ता सन्माननीय श्री.रामप्रभू पेटकर,पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघटनेचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री.हानिफ मुजावर,पुरंदर हायस्कुलचे प्राचार्य सन्माननीय श्री.इस्माईल सय्यद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सदर निवडप्रक्रिया लोकशाही पद्धतीने तसेच अतिशय आनंददायी व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

आंबळे येथील श्री शिवाजी विद्यामंदीर या प्रशालेतील शिक्षक जितेंद्र अवताडे यांची तालुका संघटकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे पुणे जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य सन्माननीय श्री.नंदकुमार सागर,सेकंडरी स्कुल को-ऑप सोसायटी मुंबईचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री.सुधाकर जगदाळे,पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सन्माननीय श्री.वसंतराव ताकवले,पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष सन्माननीय श्री.तानाजीराव झेंडे,पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे प्रवक्ता सन्माननीय श्री.रामप्रभू पेटकर,पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय श्री.हानिफ मुजावर,पुरंदर हायस्कुल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय श्री.इस्माईल सय्यद,पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री.दिलीप पापळ,पुरंदर तालुका महिला शिक्षक आघाडीच्या अध्यक्षा सौ.वर्षा देसाई यांच्या शुभहस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *