पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागात असणार्या ऐतिहासिक आंबळे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी शिवाजी सणस तर उपाध्यक्षपदी नंदकुमार दरेकर यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे.
गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुऴे आंबळे गावची ग्रामसभा झाली नव्हती त्यामुळे दीड वर्षानंतर झालेल्या ग्रामसभेस ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला.
तत्कालीन तंटामुक्ती समिती अध्यक्ष संजय जगताप यांनी अध्यक्षपदाच्या काळात खुप चांगल्या प्रकारे काम केले परंतु गावातील नविन ग्रामस्थाला हे पद द्यावे असे सांगीतल्याने ग्रामसभेच्या अध्यक्ष व गावच्या सरपंच राजश्री थोरात यांनी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदाच्या निवडीचा विषय ग्रामसभेपुढे मांडला.
शिवाजी सणस व नंदकुमार जगताप यांनी अध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे सांगीतले.त्यानंतर या दोन इच्छुकांमध्ये समेट घडवुन आणत अध्यक्षपदी शिवाजी सणस तर उपाध्यक्षपदी नंदकुमार दरेकर यांची नियुक्ति झाल्याचे आंबळे गावच्या सरपंच राजश्री थोरात यांनी जाहिर केले.
यावेळी उपसरपंच सचिन दरेकर,सदस्य अजित जगताप,मधुकर ढोले,सरस्वती शेंडगे,विठ्ठल जगताप,संगीता कुंजीर,गौरी कुंजीर,दिलीप जगताप तसेच मा. सरपंच रामनाना दरेकर,सुभाष जगताप,शशिकांत दरेकर,प्रकाश दरेकर,सुमित जगताप,अक्षय जगताप,प्रदिप जगताप,मारुती जगताप,नितीन जगताप,संजय सणस,आशिष सणस,शरद दरेकर,पोलिस पाटील जयश्री बधे आदि उपस्थित होते.