…असं करायला उद्धव ठाकरेंना लाज वाटत नाही का? ‘या’ बड्या नेत्यानी काढली उद्धव ठाकरेंची इज्जत

…असं करायला उद्धव ठाकरेंना लाज वाटत नाही का? ‘या’ बड्या नेत्यानी काढली उद्धव ठाकरेंची इज्जत

पुणे

दहशतवादी कसाबला पाठीशी घालणाऱ्या काँग्रेस पक्षासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केवळ सत्तेसाठी हातमिळवणी केली असून ते काँग्रेसच्या मांडीवर बसले आहेत. असे करताना उद्धव ठाकरेंना लाज वाटत नाही का? अशा शब्दांत अमित शहा यांनी हल्लाबोल केला आहे.

भाजपचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रचारासाठी शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विवेक पंडित, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार राजेंद्र गावित यांच्यासह इतर अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.सभेदरम्यान अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख खऱ्या शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री असा केला.

पाकिस्तानने आजवर भारतात बऱ्याच वेळा हल्ले केले. मात्र पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याचे काम देखील केले आहे. तसेच शरद पवार, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होऊ शकत नाहीत आणि झाले तरीदेखील पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊ शकत नाहीत, असे शहा म्हणाले आहेत.

अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मतपेढी कमी होईल या भीतीने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण असताना देखील शरद पवार, सुप्रिया सुळे राम मंदिर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत, असा आरोप अमित शहा यांनी केला आहे.

महाविकास आघाडीला देशाची चिंता नाही. सोनिया गांधी या केवळ आपल्या मुलाला म्हणजेच राहुल गांधींना पंतप्रधान करण्याची स्वप्ने पाहत आहेत. दुसरीकडे शरद पवार हे सुप्रिया सुळेंना, उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरेंना, लालूप्रसाद यादव आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्याच्या प्रयत्न करत आहेत. मात्र केवळ नरेंद्र मोदी हेच देशाच्या विकासासाठी धडपडत आहेत असेही अमित शहा म्हणाले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *