पुणे
अजित पवारचं पुण्याचे दादा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. चंद्रकात पाटील यांची उचलबांगडी करत अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री बनवण्यात आलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी आज जाहीर केलीय. ही यादी पाहून सरकारमध्ये अजित पवार गटाचं दबाव वाढत असल्याचं दिसतं आहे.
अजित पवार गटातील सात नेत्यांना पालकमंत्री बसवण्यात आले आहे.
पुणे- अजित पवार
• अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
• सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
• अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
• भंडारा- विजयकुमार गावित
• बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
• कोल्हापूर- हसन मुश्रीफ
• गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
• बीड- धनंजय मुंडे
• परभणी- संजय बनसोडे
• नंदूरबार- अनिल भा. पाटील
• वर्धा – सुधीर मुनगंटीवार