अग अय्यो !!!!!      पुरंदर तालुक्यात “या” गावात चक्क बांबुनेच केली जीवघेणी मारहाण

अग अय्यो !!!!! पुरंदर तालुक्यात “या” गावात चक्क बांबुनेच केली जीवघेणी मारहाण

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील नारायणपूर  येथे  एकास बांबुने जीवघेणी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.यासंदर्भात  दिपक बबन घाङगे, (वय 32 धंदा-शेती, सध्या रा.दत्त मंदीर शेजारी, नारायणपुर, ता.पुरंदर, जि.पुणे, मुऴ रा. निभुंत, लक्ष्मी नगर, ता.बारामती) यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे ज्वारीच्या शेताच्या बांधावरुन जात असताना कोणत्याही कारण नसताना आरोपी भरत सोपान बोरकर, (वय 50 रा. नारायणपुर ता.पुरंदर जि.पुणे) यांनी शिवीगाळ करून दांडक्याने मारहाण करून हातास दुखापत केली 
           
फिर्यादी दीपक बबन घाडगे गेले दोन महीन्यांपासुन रामदास काऴुराम बोरकर यांचे शेतात १०,०००/- रु महीन्याने काम करतात. त्यावर मी माझे कुटुंबाचा ऊदर्निवाह करतो.  दि.५ मार्च २०२२ रोजी  ते दुपारी १२.३० वा चे सुमारास हे त्यांचे मालक रामदास काऴुराम बोरकर यांचे शेतातील कामाला गेले असता मालकांना  सांगितले की  त्यांचे नारायणपुर येथील ज्वारीचे शेतातील ज्वरीची कनसे कापुन घराजवऴ आणुन टाका.

असे सांगितलेवरुन  फिर्यादी  रामदास काऴुराम बोरकर यांचे  दिवसभर ज्वारीचे शेतातील  कनसे खुडुन गोऴा केली व सायंकाऴी ७.३० वा. चे सुमारास ते मोटार सायकलवर बांधुन घेवुन जात असताना आरोपी भरत सोपान बोरकर रा. नारायणपुर ता.पुरंदर जि.पुणे हे हातात बांबु घेवुन  तेथे आले व काही कारण नसताना फिर्यादी यांना” तु हिते का आला?” असे म्हणुन  शिवीगाऴ करु लागले त्यावेऴी फिर्यादी त्यांना म्हणाले की,” गेले दोन महीण्यांपासुन रामदास काऴुराम बोरकर यांचेकडे कामाला आहे.

त्यांनी मला ज्वारीची कनसे तोडुन घेवुन यायला सांगितले आहे”, असे सांगितले असता त्यांनी फिर्यादी यांचे काही एक  ऐकुन न घेता त्यांचे हातातील बांबुने उजवे हातवर, पाठीवर मारहान  केली. त्यानंतर  दीपक हे  तेथुन पऴुन गेले ते  पऴुन जात असताना त्यांनी  फिर्यादी दीपक यांना ” तुला जिवे सोडत नाही, तुला मारुन टकतो”, अशी धमकी दिली. 

दिपक  पऴुन जावून लपुन बसले .व त्यांनी  मालकांना फोन करुन बोलावुन घेतले. त्यानंतर मालकांनी त्यांना  नारायणपुर येथील डाँ. धायगुडे यांचे हाँस्पीटल मध्ये उपचारकमी नेले.

फिर्यादी दिपक धायगुडे यांच्या  हातास गंभिर दुखापत झालेने सासवड येथील एका खाजगी  हाँस्पीटल येथे उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले  त्या नंतर  त्यांनी पुढील उपचारासाठी पुणे येथील  ससुन हाँस्पीटल येथे पाठविले  फिर्यादी यांनी  ससुन हाँस्पीटल येथे उपचार घेतले असता डाँक्टरांनी उजवा हात फँक्चर असले बाबत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *