अकलूज येथे मराठा सेवा संघाचा एकतिसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा

अकलूज येथे मराठा सेवा संघाचा एकतिसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा

अकलूज

बुधवार दिनांक 1 सप्टेंबर 2021 रोजी माळशिरस तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने 31 वा वर्धापन दिन अकलूज येथे संपन्न झाला सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन जिजाऊ ब्रिगेडच्या मार्गदर्शिका अक्काताई माने ,नलिनी साळुंखे ,प्रिया नागणे ,वनिता कोरटकर ,हेमा मुळीक, हेमा सांगडे ,मनीषा जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले आर्वी व उर्वी अजित माने, पुष्कराज अमोल माने यांनी जय जिजाऊ वंदना सादर केली त्यानंतर कोरोना काळात निधन झाले इंजिनीयर सचिन चौधरी , सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष बब्रुवान गुंड पाटील ,शिवराज महाराज उर्फ कैकाडी महाराज यांना शिवांजली अर्पण करण्यात आली तदनंतर प्रास्ताविक सचिव राजेंद्र मिसाळ यांनी केले.

सेवा संघ स्थापन झाल्यापासून माळशिरस तालुक्याचे अध्यक्ष असणारे उत्तमराव माने ,अशोकराव रणनवरे ,रवींद्र पवार, चंद्रशेखर गायकवाड व डॉक्टर रामचंद्र मोहिते सचिव पदावर काम केलेले उत्तमराव भानुदास माने देशमुख व राजेंद्र मिसाळ तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या स्थापनेपासून चे तालुकाध्यक्षा नलिनी साळुंके ,रुपाली जगदाळे ,प्रिया नागणे, वनिता कोरटकर यांचा सन्मान डॉक्टर राजीव राणे व तानाजी कदम यांच्या हस्ते करण्यात आला तसेच विशेष सन्मान स्थापनेच्या वेळी असणारे हंसाजी राव देशमुख, वार्ताहर विजयकुमार देशमुख, बाळासाहेब पवार ,कृष्णा बाबर यांचा देखील सन्मान करण्यात आला. विशेष अतिथी म्हणून असणारे जिल्हा नियोजन समितीवर निवड झालेले एडव्होकेट नागेश काकडे ,राहुल बापू वाघमोडे ,संदीप घाडगे व सेवा संघास कायदेशीर मार्गदर्शन करणारे एडव्होकेट जयसिंगराव पाटील यांचा देखील सेवा संघाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.

मुख्य कार्यक्रम कोरोणाच्या मारीत माळशिरस तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सेवारत असणारे वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी ,आशा सेविका, कुष्ठरोग प्रयोग पर्यवेक्षक इत्यादींचा मराठा सेवा संघाच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र ,रोप ,पुस्तक देऊन मराठा सेवा संघाच्या वतीने उत्तमराव माने, डॉ राजीव राणे, डॉ कदम,डॉक्टर मोहिते ,राजेंद्र मिसाळ, निनाद पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कोरोणा योद्धे खालील प्रमाणे
डॉक्टर राजीव राणे ,डॉक्टर तानाजी कदम, डॉक्टर रामचंद्र मोहिते ,अकांक्षा कैलास मोरे, सुनिता हनुमंत शिंगाडे ,मीना शिवाजी मोरे ,सुंदर दत्तात्रय गायकवाड, विठ्ठल देवराव कोडग ,अशोक शांताप्पा कारंजे, उदय सणस, अशोक पताळे ,श्रीकृष्ण विठ्ठल जमदाडे, जीवन कला बाबुराव रोटे, मनीषा जाधव ,मनीषा दिलीप गाडे, अनिता नानासाहेब मोहिते,संजीवनी दत्तात्रय चव्हाण, प्रियांका विठ्ठल काटकर ,मैना नागेश इंगोले ,रूपाली दत्तात्रय काळे, स्नेहल दत्तात्रय गायकवाड ,प्रतिमा विलास पाटील, स्वाती संजय वरकड, गोविंदा सुरेश वाघमारे ,प्रियंका दादासाहेब लोंढे, अर्चना नंदकुमार जगदाळे, इत्यादींचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला कोरोनाच्या महामारीत वार्ताहर म्हणून काम केलेले बारामती झटक्याचे श्रीनिवास कदम पाटील ,पुण्यनगरीचे विनोद पाटील, लोकमत राजेंद्र मिसाळ यांचा देखील विशेष सन्मान उत्तमराव माने यांचे शुभ हस्ते करण्यात आला
जयदीप बबनराव शेंडगे ऑल इंडिया पातळीवर आर्किटेक्चर या क्षेत्रात विशेष प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल त्यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला.

नलिनी साळुंखे यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या स्थापनेपासून चा आढावा त्यांचे मनोगतात सांगितला व आरक्षणासाठी सेवा संघाने कायमस्वरूपी लढा चालू ठेवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने यांनी त्यांचे मनोगत सेवा संघ स्थापनेपासून आज पर्यंत तालुक्यात झालेले काम सोलापूर जिल्ह्यात झालेले काम व संपूर्ण महाराष्ट्रात मराठा सेवा संघाच्या माध्यमातून तीस वर्षात झालेले कामाचा लेखाजोखा मांडला व सर्वजण कार्यक्रमास उपस्थित राहिले याबद्दल सर्वांचे आभार मानले व सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या .

कार्यक्रमास उत्तमराव माने, डॉक्टर रामचंद्र मोहिते ,राजेंद्र मिसाळ ,पाटील ,अक्काताई माने ,अक्षदा माने, अजित माने, प्रिया नागणे, वनिता कोरटकर,हेमा मुळीक,उमा वाळके, अश्विनी पाटील, रोहिणी भोंग, हेमा सांगडे ,धनंजय साखळकर इत्यादी संभाजी ब्रिगेड, सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *