purandhar crime news !!!!!  चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा कापुन खुन करणाऱ्या पतीच्या फक्त 18 तासातच पोलिसांनी आवळल्या मुसक्या

purandhar crime news !!!!! चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा कापुन खुन करणाऱ्या पतीच्या फक्त 18 तासातच पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुरंदर

काल दि.25/02/2023 रोजी सायंकाळी 6ः00 वा. दरम्यान सासवड पोलीसांना खबर मिळाली की, सासवड जवळ वाघापुर रोडवरील आंबोडी फॉरेस्ट मध्ये एक महिला जखमी अवस्थेत पडलेली असुन तिचे कपडे रक्ताने भरलेले आहेत. तिचे जवळ 2 वर्षाचे लहान मुल रडत बसले आहे. सासवड पोलीसांनी तात्काळ तेथे जावुन त्या जखमी महिलेस व लहान मुलास अॅम्बुलन्समधुन सासवड रूग्नालय येथे आणले. तेथे डाॅक्टरांनी महिलेचा कशानेतरी गळा कापल्याने मयत झाल्याचे सांगितले. सुरवातीला तिची ओळख पटवणे अवघड होते परंतु तिचे जवळील पिशवीत एक चिठठी मिळुन आली त्यावर नाव व मोबाईल नंबर होता. त्यावर फोन करून माहिती घेतली असता तिचे नाव अनिता महेश बनकर, रा.माळशीरस, ता.पुरंदर, जि.पुणे असल्याचे समजले. पोलीसांनी नातेवाईकांचा शोध घेवुन मयत महिलेची ओळख पटवल्यानंतर समजले की, पती महेश व मयत पत्नी अनिता यांचेत कौटुंबिक वाद आहेत व दोघे पती पत्नी एकमेकांपासुन वेगळे पती महेश हा त्याचे आई, भाउ व मुलगी सह आंजलीनगर, कात्रज, पुणे व पत्नी अनिता हि आंबेडकरनगर, मार्केट यार्ड, पुणे येथे राहात असल्याचे चौकशीत समजले. दोघा पती पत्नीचे वाद असल्यामुळे व पती महेश बनकर याचा फोन सायंकाळी 6ः00 वा. पासुन बंद येत असल्याने सासवड पोलीसांना संशय वाढला की, अनिता हिचा खुन हा तिचा पती महेश बनकर यानेच केला असावा. दरम्यान मयत अनिता हिचे नातेवाईकांनी सासवड पोलीस स्टेशन येथे पती महेश बनकर यानेच अनिता हिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिला जिवे ठार मारले आहे व लग्न झालेपासुन अनिता हिला पती महेश बनकर व सासु कमलाबाई बनकर हे तिचे चारीत्र्यावर संशय घेवुन शारीरीक, मानसिक त्रास देत होते. सदर बाबत ससवड पोलीस स्टेशन येथे गु.रजी.नं. 119/2023 भा.दं.वि.का.क. 302, 304(ब), 498(अ), 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला.

पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी तात्काळ सहा. पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, गणेश पोटे, निलेश जाधव, सुहास लाटणे यांना पती महेश बनकर यांचा शोध घेवुन ताब्यात घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे वरील पथकाने महेश बनकर राहात असले ठिकाणी आंजलीनगर, कात्रज, पुणे येथे जावुन शोध घेतला तो मिळुन आला नाही. त्यानंतर त्याचे मुळ गावी माळशीरस, ता.पुरंदर येथे जावुन शोध घेतला तो मिळुन आला नाही. मयत अनिता हिचे पोस्ट माॅर्टेम झाले पण जोपर्यंत ‘‘पोलीस आरोपीस अटक करत नाही तो पर्यंत आम्ही अनिताचा मृतदेह ताब्यात घेणार नाही’’ असे तिचे नातेवाईकांनी आग्रह धरला.

तपासा दरम्यान आज सकाळी 11ः00 वा. पोलीस पथकास बातमी मिळाली की, महेश बनकर हा नाझरे येथिल हाॅटेल मयुरमध्ये बसला आहे. वरील पोलीस पथक तात्काळ तेथे पोहाचले परंतु पोलीस पाहोचण्यापुर्वी 10 मिनीट महेश बनकर हा नायगांवच्या बाजुने पांढरे रंगाच्या स्कुटी मोटार सायकलवर गेल्याचे समजले. पोलीस नायगावच्या बाजुने गेले असता रोडवर हाॅटेल आकाश समाधानचे समोर महेश बनकर यांची पांढरे रंगाच्या स्कुटी मोटार सायकल दिसली. पोलीस गाडीतुन खाली उतरत असल्याचे पाहताच महेश बनकर हाॅटेलच्या पाठिमागे शेतात पळत सुटला. परंतु पोलीसांनी त्यास काही अंतरावर पाठलाग करून ताब्यात घेतले व त्याने सांगितले की, ‘‘आम्हा पती पत्नीचे वाद होत असत, आम्ही वेगवेगळे राहात होतो, परंतु तिचे वागणे बरोबर नव्हते, नको त्या लोकांशी ती बोलत होती, माझे एैकत नव्हती. म्हणुन तोच राग मनात धरून तिला गोड बोलुन पुणे येथुन मोटार साकलवर बसवुन सासवड येथे घेवुन आलो व फाॅरेस्टमध्ये नेवुन पत्नी अनिता हिचा चाकुने गळा कापुन खुन केला’’ असल्याची कबुली दिली. सासवड पोलीसांनी पती व सासु यांना गुन्हयाचेकामी अटक केली आहे.
1)पती – महेश पंडीत बनकर, वय. 24 वर्षे, रा.माळशीरस, ता.पुरंदर, जि.पुणे.
सध्या. अंजलीनगर, कात्रज, पुणे.

2)सासु – कमलाबाई पंडीत बनकर, वय. 45 वर्षे, रा.माळशीरस, ता.पुरंदर, जि.पुणे.
सध्या. अंजलीनगर, कात्रज, पुणे.

वरील कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो, अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक सो, बारामती आनंद भाईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, भोर विभाग धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन आण्णासाहेब घोलप, सहा.पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पोलीस नाईक गणेश पोटे, निलेश जाधव, सुहास लाटणे, पलप्रतीक धिवार, सुनिल कोळी (सायबर पोलीस स्टेशन), पोलीस मित्र सचिन चंदनशीव, शुभम घोडके यांचे पथकाने केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *