PURANDAR BIG BREAKING!!!!   तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या “जगताप” ला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

PURANDAR BIG BREAKING!!!! तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या “जगताप” ला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

पुरंदर

पोलिस निरीक्षकाकरिता तब्बल 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या दोघांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने अटक केली आहे. थेट पोलिस निरीक्षकासाठी एवढ्या मोठ्या लाचेची मागणी झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. अक्षय सुभाष मारणे आणि गणेश बबनराव जगताप (रा .सासवड, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी सासवड पोलिस स्टेशन येथे तक्रारी अर्ज केला होता.

त्यावरून गुन्हा दाखल करण्याकरीता सासवड पो.स्टे. चे पोलिस निरिक्षक घोलप यांचेकरीता अक्षय मारणे याने 3,00,000 (तीन लाख रूपये ) लाचेची मागणी केली त्या लाचमागणीस गणेश जगताप (रा.सासवड) याने सहाय्य केले. म्हणुन लाचमागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.दरम्यान, जगताप पुणे जिल्ह्यातील सासवड येथील मोठ्या राजकीय नेत्याचा जवळचा नातेवाईक (चुलत भाऊ) आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे , अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक क्रांती पवार,पो नि संदीप वऱ्हाडे, सहा पो उप नि – मुकुंद आयाचीत ,पो काॅ तावरे,चालक पो कॉ पांडुंरग माळी यांनी केली आहे.

ही कारवाई झाल्यानंतर पुरंदर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *