पुणे
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिचे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगल्यानंतर निराश झालेले देशवासीय झोपेत असतानाच विनेशने धक्कादायक निर्णय घेतला. विनेशने कुस्तीला अलविदा करण्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ किंबहुना Heart Breaking News गुरुवारी पहाटे ५ वाजून १७ मिनिटांनी जाहीर केली.
पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या ५० किलो वजनी गटातील फ्रीस्टाईल कुस्तीच्या अंतिम फेरीत अपात्र ठरल्यानंतर विनेशने हा मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटरवर पोस्ट लिहित विनेशने हा भारतीय चाहत्यांच्या हृदयात कालवाकालव करणारा निर्णय जाहीर केला आहे.
आई कुस्तीने माझ्यावर विजय मिळवला, मी हरले, मला माफ करा…. तुमची स्वप्नं आणि माझं धैर्य, सगळं काही भंग पावलं आहे, माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद उरलेली नाही. अलविदा कुस्ती 2001-2024 मी तुम्हा सर्वांची सदैव ऋणी राहीन, क्षमस्व” अशा आशयाची पोस्ट विनेशने लिहिली आहे