पुणे
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कंपनीला मध्यरात्री २ वाजता नोटीस देण्यात आली आहे.
बारामती ॲग्रो कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठवत दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राजकीय सुडापोटी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कंपनीला मध्यरात्री २ वाजता नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती ॲग्रो कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठवत दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याबाबत रोहित पवार यांनी ट्वीट करत माहिती दिली असून दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.