पुणे
माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांचा बोलविता धनी हा शरद पवार गटातील नेता असल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी केला.
बोरवणकरांनी केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत. नाहीतर कायदेशीर कारवाईला समोर जावं असा इशारा अमोल मिटकरींनी बोरवणकरांना दिलाय. ते अकोला येथे माध्यमांशी बोलत होते.
अमोल मिटकरी म्हणाले,मीरा बोरवणकरांचे आरोप बिनबुडाचे आहेत. बोरवणकरांनी केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत. नाहीतर कायदेशीर कारवाईला समोर जावे. बोरवणकरांनी आपलं भंगार पुस्तक विकलं जावं यासाठी असे आरोप केलेत.
याचा बोलविता धनी कोण?ज्याला आमच्याकडे यायचं होतं. परंतु तिकडे राहून दाखवायचं होतं असा नेता आहे. हा आरोप आमच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून करण्यात आला आहे. घर का भेदी लंका ढाये असा प्रकार आहे.