Big Breaking!!!!!!                           सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात मोठी फूट; “या” फेडरेशनची माघार, आजपासून कामावर रुजू होणार

Big Breaking!!!!!! सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात मोठी फूट; “या” फेडरेशनची माघार, आजपासून कामावर रुजू होणार

पुणे

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपामुळे राज्यातील प्रमुख शहरातील प्रशासकीय यंत्रणा खोळंबल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला. अशातच संप सुरू होऊन दोन दिवसाचा कालावधी उलटलेला असतानाच संपात फूट पडल्याचं दिसून येत आहे. ठाणे आणि सोलापूर पाठोपाठ आणखी एका कर्मचारी संघटनेनं संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशन यांनी संपातून माघार घेतली आहे.

या संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी संपावर न जाता केवळ काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या एकजुटीला मोठा धक्का बसल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, फेडरेशनने याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रद्वारे कळवलं आहे. महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशन यांनी १४ मार्च २०२३ रोजी पुकारलेल्या संपाबाबत दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ आपणास संपात सहभागी होणार असल्याचं पत्राद्वारे कळवलं होतं.

त्यानुसार फेडरेशनने १४-१५ मार्च रोजी काळ्या फिती लावून संपात सहभाग घेतला.आज कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दुरध्वनीवरून चर्चा झाली. त्यांनी फेडरेशनला पाठवलेल्या पत्रानुसार लवकरच फेडरेशन पदाधिकाऱ्यांना चर्चेकामी वेळ देण्याचं ठरवलं असून याबाबत तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे. त्या अनुशंगाने आमची राज्यातील प्रतिनिधींशी चर्चा झाली असून उद्या दिनांक १६ मार्च २०२३ पासून राज्यातील महापालिकेतील सर्व कर्मचारी प्रत्यक्ष काम बंद न करता काळ्या फिती लावून सेवा देतील, असं फेडरेशनने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *