Big Breaking!!!!! मतदानाच्या दिवशीच अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक;एकाच दगडात मारले दोन पक्षी

Big Breaking!!!!! मतदानाच्या दिवशीच अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक;एकाच दगडात मारले दोन पक्षी

पुणे

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. बारामतीत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत होत आहे. मागील काही दिवसापासून आरोप प्रत्यारोपावरून बारामतीतील राजकीय वातावरण चांगलं ढवळून निघालं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अभुतपूर्व फूट पडल्याने संपूर्ण पवार कुटुंब शरद पवार यांच्या पाठीमागे उभे राहिले. त्यामुळे अजित पवार हे एकाकी पडल्याचे बोलले जात होत. अगदी अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांच्या आई सुद्धा शरद पवार यांना साथ देणार अशा चर्चा होत्या.

मात्र मतदानाच्या दिवशी अजित पवार यांनी मास्टर स्ट्रोक खेळला. अजित पवार मंगळवारी सकाळी जेव्हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आले. तेव्हा आशाताई अनंतराव पवार यादेखील त्यांच्यासोबत होते यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. कारण श्रीनिवास पवार यांनी दोन दिवसापूर्वीच अजित पवार यांच्यावर आई नाराज असल्याचे म्हटलं होतं.

कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवार यांची आई बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे रहायला गेल्या आहेत. असं ही श्रीनिवास पवार म्हणाले होते. आज अजित पवार यांनी मतदानाला येताना आईला सोबत आनत विरोधकांच्या आरोपांमधील सर्व हवाच काढून घेतली. दरम्यान मतदान केल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

यावेळी अजित पवार यांनी आपल्यासोबत आई आल्याचा आवर्जून उल्लेख केला. आशाताई अनंतराव पवार आमच्या घरात सर्वात ज्येष्ठ आहेत असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला. माझी आई माझ्यासोबतच आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी. असे अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले.

मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितले की बारामतीतील निवडणूक ही भावकीची आणि गावकीची नाही. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे.त्यामुळेच पुढील पाच वर्षांचा विकास डोळ्यासमोर ठेवून मतदान करा,अस आवाहन अजित पवारांनी मतदारांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *