Big breaking !!!!! “या” गावत घरात घुसून महिला “सरपंचांना” चार जणांनी मारलं ; दिली जीवे मारण्याची धमकी

Big breaking !!!!! “या” गावत घरात घुसून महिला “सरपंचांना” चार जणांनी मारलं ; दिली जीवे मारण्याची धमकी

नांदेड

नांदेड जिल्ह्यात एका महिला सरपंचाला मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

जुन्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे काल महिला सरपंच यांना मारहाण झाली. महिला सरपंच राधाबाई जोगेवार यांना बालाजी मातावाड आणि माधव दंडेवाड यांच्यासह चार जणांनी रात्री दहाच्या सुमारास घरात घुसून मारलं.

आमच्या विरोधात तक्रार का देता म्हणून महिला सरपंच राधाबाई जोगेवार यांना मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी चौंघांवर कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सरपंचाला मारहाण केल्याची घटना घडल्याने मारहाण करणाऱ्या चारही जणांवर कडक कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *