Big Breaking!!!!!   “…तर मी पक्ष सोडेन, राजीनामा देऊन टाकेन”,मा.राज्यमंत्री विजय शिवतारेंचे खळबळ उडवून टाकणारं विधान

Big Breaking!!!!! “…तर मी पक्ष सोडेन, राजीनामा देऊन टाकेन”,मा.राज्यमंत्री विजय शिवतारेंचे खळबळ उडवून टाकणारं विधान

पुणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही अडचण येत असेल तर मी पक्ष सोडेन, मी राजीनामा देऊन टाकेन”, अशी भाषा शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी केली आहे. विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीने दावा सांगितलेल्या अजित पवारांच्या बारामतीच्या जागेवरून निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले होते.

त्यामुळे महायुतीत धुसफुस सुरू होती. त्यात आज शिवतारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर देखील त्यांनी निवडणुकीत माघार न घेण्याचा निर्णय घेतला आहे.विजय शिवतारे यांनी एक्सक्लुझीव्ह बातचीत केली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील शिवतारेंनी सांगितला.

”मी मुख्यमंत्री शिंदेंना म्हटलं दोन-चार दिवस थांबा. मला लोकांशी बोलून दिल्या. तुम्ही जे सांगताय ते करण्याचा प्रयत्न केला, तर मला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही, लोक शेण घालतील माझ्या तोंडात. त्यामुळे मला वेळ द्या, मी दोन दिवसानंतर मी पुन्हा चर्चा करेन आणि काय करायचं ठरवेन, असे  शिवतारेंनी सांगितले. 

विजय शिवतारे माघार घेणार का? असा सवाल शिवतारेंना विचारला होता. यावर शिवतारे म्हणाले, ‘माघार घ्यायची नाही.लोकांच्या ज्या भावना आहेत त्या तीव्र आहेत, आणि लोकांच्या भावनांचा आदर करणे हे लोकशाहीमध्ये परमकर्तव्य असल्याचे’ शिवतारे सांगतात. तसेच शिवतारे युतीचा धर्म म्हणून पवारांचा प्रचार करणार का? यावर शिवतारे म्हणाले, ‘मी आपला स्वाभिमान सोडणार नाही. प्रचाराचा प्रश्नच येत नाही.

मी पक्ष सोडेन, राजीनामा देऊन टाकेन. मुख्यमंत्र्यांना काही अडचण होत असेल तर मी राजीनामा देऊन टाकेन. नेतेपदाचा राजीनामा देईन आणि जेव्हा सगळं संपेल तेव्हा पुन्हा सेवेत येईन,असे शिवतारे यांनी सांगितले. शिवतारे पवार साहेबांवर काहीही बोलतो. काहीही बोलायला मला कुत्रा चावलाय का? भर सभेत बोलले अरे विजय शिवतारे तु बोलतोय काय? तुझा अवाका किती? तु कोणावर बोलतोस? तुझी किती लायकी? मी छोटा माणूस आहे.

माझी काय लायकी आहे. अहो अजित पवार कशाला डिस्टर्ब होताय, उलट तुम्ही म्हटलं पाहिजे तुम्ही लढा.आम्ही कुठेही एकही माणूस उभा करणार नाही. विजय शिवतारेंना लढू द्या, असं उलट जाहीर केलं पाहिजे अजित पवारांनी. मी कुठे त्रास देणार नाही. मी कुठेही अपक्ष उभा करणार नाही, दुध का दुध पाणी का पाणी होऊ दे. असं बोलू द्या. ही जी प्रवृत्ती आहे ना आपलं साधत नाही म्हणून ब्लॅकमेलिंग करायची, असा आरोप शिवतारेंनी अजित पवारांवर केला. 

पण ते हे करण्याऐवजी आमच्या मुख्यमंत्र्यांवर दबाव (प्रेशर) आणतात.  इकडे प्रेशर, युतीवर प्रेशर…आम्ही सगळीकडे माणसं उभी करू.. कशासाठी हे करताय, उघडपणे दबाव आणताय…तिकडे आनंद परांजपे म्हणताय भारी पडेल आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या विरूद्द उमेदवार उभी करू,असा आरोप शिवतारेंनी अजित पवारांवर केला. तसेच श्रीनिवास पवार म्हणतात हा नालायक आहे.  

मी तर बोलत होतो हा उर्मट आहे.इतक्या खालच्या थरावर येण्याची गरज नाही. थोडी सभ्यता तर जपली गेली पाहिजे.  प्रेशर टॅक्टीक करतायत, नीच पातळीवरच राजकारण करतात, नालायकपणा करण्याचा आम्हाला जन्मसिद्ध हक्क आहेत,असा टोलाही शिवतारेंनी अजित पवारांना लगावला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *