Big Breaking!!!!!राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची निवृत्तीची घोषणा

Big Breaking!!!!!राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची निवृत्तीची घोषणा

पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मंगळवारी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली.

या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला असून जोपर्यंत हा निर्णय माघारी घेतला जात नाही तोपर्यंत सभागृह सोडणार नाही असे म्हणत राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

यावेळी यशवंतराव चव्हाण सहभागृहात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.शरद पवार यांच्या ‘लोक माझ्यासंगती: या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकर्षणाचा सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी सभागृहाला मार्गदर्शन करताना आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली.

याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याच बरोबर नेत्यांनी विरोध केला. संपूर्ण सभागृह वाहक झालं होतं यावेळी आमदार धनंजय मुंडे यांनी थेट शरद पवार यांचे पाय धरत हा निर्णय माघारी घेण्याची विनंती केलीयावेळी शरद पवार म्हणाले की 56 वर्षे सत्तेच्या राजकारणामध्ये माझा सहभाग राहिला. आता मी निवडणुकीला उभा राहणार नाही.

आता राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नावर अधिक लक्ष घालण्यावर माझा भर असणार आहे. याशिवाय मी कोणतीही दुसरी अन्य जबाबदारी घेणार नाही. एक मे 1960 ते 1 मे 2023 या प्रदीर्घ कालखंडानंतर कुठेतरी थांबण्याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदावरुन पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *