Big Breaking!!!!!महिला,अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांनी महाराष्ट्र हादरला;महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा

Big Breaking!!!!!महिला,अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांनी महाराष्ट्र हादरला;महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा

पुणे

राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे. यादरम्यान राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या आणि बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत निषेधार्ह आणि बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रूपाली चाकणकर यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली जात आहे.

पुणे शहरातील कार्यरत असलेल्या महिला संघटनांच्या प्रतिनिधींकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे चाकणकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळाकडून हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले आहे.

बदलापूर, लातूर, पुणे, मुंबई, दौंड, छत्रपती संभाजीनगर, अकोला आदी शहरांमध्ये झालेल्या महिला आणि बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या अनुषंगाने अत्यंत संताप व्यक्त केला जात आहे. अशा वेळी पीडित कुटुंबीयांना आधार देत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी मात्र पीडित कुटुंबियांनीच मुलींकडे लक्ष द्यावे, अशी वक्तव्य केलेली आहेत.

ही बाब अत्यंत धक्कादायक आणि निंदाजनक असल्याने चाकणकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.राज्याच्या मुख्य सचिवपदी, तसेच राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर महिला अधिकारी कार्यरत असताना या घटनांकडे प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करत आहेत हे अशोभनीय आहे.

मुख्य सचिव आणि महासंचालकांनी राज्यातील महिला अत्याचाराच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेत, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन आणि गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, याबाबतची श्वेतपत्रिका तात्काळ जाहीर करावी, अशीही मागणी या वेळी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *