2024 मध्ये अजित पवारांचाच करेक्ट कार्यक्रम होईल; भाजपच्या “या” बड्या नेत्याचं खळबळजनक विधान

2024 मध्ये अजित पवारांचाच करेक्ट कार्यक्रम होईल; भाजपच्या “या” बड्या नेत्याचं खळबळजनक विधान

पुणे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधासभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवारांनी विरोधीपक्षनेतेपद आपल्याकडे ठेवलं. ते जयंत पाटलांना द्यायला हवं होतं. येत्या २०२४ निवडणुकीत अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
 
इतकंच नाही तर, ओबीसी आरक्षणाची फाईल अजितदादांनी फेकून दिली होती, असा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. त्याचबरोबर माझा करेक्ट कार्यक्रम करण्याची त्यांच्यात हिंमत नाही. अजितदादा कधी रडतात तर कधी ८-८ दिवस फोन बंद करून पळून जातात, असा घणाघातही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा चांगलाच समाचार घेतला होता. ‘सप्टेंबर महिन्यात भाजपचं सरकार आल्यानंतर भाजपचे एक नेते बारामतीत आले. त्यांनी सांगितलं, बारामतीत घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशा प्रकारच्या वल्गना करतात. आता आमचं तिथे काम आहे. खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? मी जर मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल’, असं अजित पवार म्हणाले होते.

दरम्यान, अजित पवारांच्या या इशाऱ्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी अजित पवार यांचा करेक्ट कार्यक्रम होईल, असा इशाराच देऊन टाकला. चंद्रशेखर बानकुळे हे आज मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

बावनकुळे म्हणाले, ‘अजित दादांमध्ये मला वाटलं हिंमत आहे. मी एकच दौरा केला तर माझा ते करेकट कार्यक्रम करायला निघाले. राष्ट्रवादी काॅग्रेस व काॅग्रेस एकत्र येऊन सुद्धा सत्तेत आले नाही. दादांच्या विशेषता पवार कुटुंबिांबाबात बारामतीत नाराजी आहे. जनता तेथील नाराज आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेल.’

अजितदादांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. दादांना आम्ही ८ दिवस पळून जाताना पाहिलं, रडताना पाहिलं दादांना कायम क्रिम पोस्ट मिळत आल्या आहेत. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, विरोधीपक्ष नेते हे योग्य नाही. त्या जागी जयंत पाटील याना संधी मिळयला हवी होती, असा चिमटाही बावनकुळे यांनी काढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *