“हर घर तिरंगा हर घर झाडी” झाडे लावून पर्यावरण संवर्धन,संरक्षण करून आपला परिसर स्वच्छ ठेवून स्वातंत्र्य दिन साजरा : सरपंच सिमा भुजबळ

पुरंदर

दौंडज येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा विविध कार्यक्रमांचे आयोजन पुरंदर तालुक्यातील दौंडज ग्रामपंचायतीच्या वतीने देशाचा 75 वा.भारतीय अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात विद्यमान सरपंच सिमा निलेश भुजबळ यांनी ध्वजारोहण केले.

या प्रसंगी सरपंच सिमा भुजबळ यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व स्वच्छतेचे महत्व पटवून देताना हर घर तिरंगा, त्यांच प्रमाणे घर घर झाडी या उपक्रमातुन उपस्थित नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थींना ग्रामपंचायतीच्या वतिने चिंच, आंबा, आवळा, बेल, वड, पिंपळ आदी भारतीय झाडांचे वाटप करण्यात आले.

ही झाडे लावून पर्यावरण संवर्धन, संरक्षण करून आपला परिसर स्वच्छ ठेवून ख-या अर्थाने आपण सर्वांनी दररोज स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे आवाहन केले.या वेळी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
होते.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांच्या स्मृती प्रित्यार्थ चौकांमध्ये भारत माता, आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मान्यवरांकडून हार, पुष्प अर्पण करुन त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यात आले.

दौंडज ग्रामपंचायत, भारती विद्यापीठ संचालित, डाॅ.पतंगराव कदम विद्यालय, प्राथमिक शाळा दौंडज यांनी आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीमध्ये गावातील प्राथमिक, माध्यमिक, शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थीनीं बरोबरच गावातील सर्व धर्माच्या आबाल वृद्धांनी व मान्यवरांनी आपला सहभाग नोंदवत
भारत माता की जय,वंदे मातरम् च्या घोषणांनी परिसर आनंदी आनंद झाला होता.

शासनाच्या आदेशानुसार 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा घरा घरावर फडकतना दिसत होता.
त्याच प्रमाणे शाळेतील ध्वजारोहण मुख्याध्यापिका मनिषा फरांदे, प्राथमिक उपकेंद्रातील ध्वजारोहन ग्रामपंचायत शिपाई वसंत येळे यांच्या हस्ते करण्याचा मान ग्रामस्थांनी दिला. त्याचप्रमाणे तीनी वॉर्डातील अंगणवाडीतील ध्वजारोहण फौजी दत्तात्रय इंदलकर, उपसरपंच नंदा कदम, पोलिस पाटील दिनेश जाधव, अंगणवाडी मद्दतनीस शोभा कदम, ग्रामपंचायत सदस्य सोपान दगडे, अमोल कदम, रामदास भोसले, अनुजा कदम, फौजी पत्नी शांताबाई कदम, या विविध मान्यवरांनी केले.

या वेळी विद्यमान सरपंच सिमा निलेश भुजबळ, उपसरपंच नंदा जगन्नाथ कदम, ग्रामसेवक डि. बी. शिंदे, ग्रामपंचायत सदस्य रामदास भोसले, सोपान दगडे, अमोल कदम, अनुजा कदम, अर्चना भोसले, अलका माने, विजय फाळके, माजी सरपंच जगन्नाथ कदम, दत्तात्रय कदम, पोलिस पाटील दिनेश जाधव, चेअरमन प्रताप इंदलकर, शासकीय कर्मचारी, शिक्षक, गावातील मान्यवर व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *