हरणी येथे बच्चुभाऊ कडू यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त 51 वृक्ष लावून यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला

हरणी येथे बच्चुभाऊ कडू यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त 51 वृक्ष लावून यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला

पुरंदर तालुक्यातील हरणी येथिल महादेव डोंगरावर आज अपंगांचे दैवत माननीय राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त 51 वृक्ष लावून यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 19 ऑगस्ट 2012 पासून अपंग क्रांती आंदोलन संघटनेची स्थापना करण्यात आली. त्याचा आपण एक छोटसं रोप पुणे येथे लावलं त्याचा वटवृक्ष होऊन त्या संघटनेचा संपूर्ण जगभर गाजावाजा आहे.

संघटनेच्या माध्यमातून अपंग अनाथ शेतकरी कामगार वर्ग यांच्या नायकासाठी शासन दरबारी त्यांच्या मागण्या पूर्ण करीत असताना ते नेहमीच आवाज येत असतात. असे हे राज्याचे मंत्री बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस देखील वटवृक्ष लावून साजरा करण्यात आला आहे. हेच लावलेलं ५१ रोपटे त्याचे पुढे वटवृक्षात रूपांतर व्हावे व त्याची सावली सर्वत्र मिळावी या दृष्टिकोनातून आज हरणी येथील महादेवाच्या डोंगरावर दिव्यांग बांधवांनी गुलमोहर ,चिंच, वड, करज,सोनचाफा अशी ५१ झाडे लावून वाढदिवस साजरा करण्यात आला.

दिव्यांग बांधवांना न्याय मिळवण्यासाठी गल्ली ते दिल्ली पर्यंत संसद भवन ला घेराव घालूनदिव्यांग बांधवांना मानसन्मान मिळवून दिला व त्यांचे न्याय हक्क मिळवून दिले. प्रार्थना क्रांती आंदोलन संघटनेच्या राज्य महिला अध्यक्ष सुरेखा ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संजय गांधी समितीचे सदस्य संभाजी माऊली संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे अतुल शिर्के, महेंद्र राऊत सायली जाधव,संदीप जगताप, रामदास शिंदे बहुसंख्य अभंगांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी सासवड नजीक असलेल्या झोपडपट्टीमध्ये महिलांना साडी वाटप करण्यात आले. असे हे आमचे दैवत प्रेम रतन गोरगरिबांच्या गळ्यातील ताईत माननीय नामदार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांना उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *