स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने सासवड एस.टी. आगारातील महिला चालक वाहकांचा महिला दिनानिमित्त सन्मान….

स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने सासवड एस.टी. आगारातील महिला चालक वाहकांचा महिला दिनानिमित्त सन्मान….

सासवड

आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सासवड एस टी आगारातील एकमेव महिला चालक, इतर वाहक महिला, कार्यालयीन महिला कर्मचारी तसेच आगार सफाई करणाऱ्या महिला यांचा सन्मान करण्यात आला. सासवड येथील स्व.एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने या
कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सासवड आगारातील दत्त मंदीर परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमास सेवानिवृत्त मुख्याध्यापक मीलन जाधव, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, आगार व्यवस्थापक सागर गाडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, भेटवस्तू, दिनदर्शिका देवून यावेळी महिलांचा सत्कार करण्यात आला.


प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांनी प्रास्ताविकातून पुरस्काराबाबत भुमिका मांडली वाहतूक नियंत्रक पोपट जैनक यांनी उपस्थितांचे स्वागत केले.महाराष्ट्रातील पहिली महिला एस टी चालक अर्चना महादू अत्राम, संगीता भागवत, ज्योत्स्ना कवळे, राधिका काकडे, अश्विनी शिंदे या वाहक भगिनी तसेच श्वेता कुंभार, लक्ष्मी गायकवाड, प्रतिक्षा यादव
रुपाली गिरमे या कार्यालयीन कर्मचारी आणि
शुभांगी खडके, छाया पवार आणि शकुंतला
जाधव या सफाई महिला कामगारांचा यावेळी
मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.


वाहक संगीता भागवत व चालक अर्चना अत्राम यांनी सत्काराला उत्तर दिले. सागर गाडे यांनीही मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाविषयी
गौरोवोद्गार काढले.


प्रमुख अतिथी मीलन जाधव यांनी महिलांच्या कार्यकर्तुत्वाची अनेक उदाहरणे देत अन्य देशांच्या तुलनेत येथील महिला अजूनही
स्वतंत्र नसल्याचे सांगीतले.

कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन जाधव यांनी केले. घर प्रपंच सांभाळून तुम्हीं एस टी सेवा देत आहात तुम्हाला खरोखर मानाचा मुजरा अशा शब्दात त्यांनी सर्व पुरस्कारार्थींचे कौतुक केले. प्रतिष्ठानचे सचिव हेमंत ताकवले यांनी सुत्र संचालन केले तर लेखाकार श्वेता कुंभार
यांनी आभार प्रदर्शन केले.


एस टी आगारातील राजाराम गायकवाड
दत्तात्रय मदने, कैलास जगताप सुयश इन्फोटेक
चे गणेश सनिल अंकुर शिवरकर यांसह आगारातील कर्मचारी, अधिकारी, पुरस्कारार्थिंचे नातेवाईक याप्रसंगी
उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *