सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उमेदवार शांताराम कापरे यांची उमेदवारी रद्द करावी : संदिप चिकणे

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उमेदवार शांताराम कापरे यांची उमेदवारी रद्द करावी : संदिप चिकणे

पुरंदर

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्‍वरनगर ता. बारामती ची संचालक मंडळाची निवडणूक 2021 च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडुन मांडकी जवळाअर्जुन गटातुन उमेदवारी आर्ज शांताराम कापरे यांनी दाखल केला आसुन त्याना तीन अपत्य आहेत त्याच बरोबर उमेदवारी अर्ज दाखल करताना सहकारी संस्थेच्या थकबाकी बाबत खोटा दाखला देखील निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिला आहे. कारणाने त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष संदीप चिकणे यांनी केली आहे. या मुळे पुरंदर तालुका राष्ट्रवादीला घरचा आहेर मिळाला आहे

संदीप चिकणे यांनी आसे सांगून याबाबत न्यायालयात दावा दाखल करणार आहे. तसेच शांताराम कापरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सहकारी संस्थेच्या थकबाकी बाबत खोटा दाखला देखील निवडणूक अधिकारी यांना दिला आहे. सोमेश्‍वर कारखान्याच्या निवडणुकीत नझरे क.प गावावर आन्याय होत आहे.

गेली पंचवीस वर्षं नाझरे क प कर उमेदवारी पासून वंचित आहेत. ही याबाबत वरिष्ठ पातळी वरून या गावचा विचार होणे अपेक्षित होते. मात्र यावेळी नाझरे क. प गावाला डावलण्यात आले असल्याचे चिकणे यांनी सांगितले. तर नाझरे क प गावातील मतदान देखील जास्त आहे. तरी देखील गावाला डावलले जात आहे : संदिप चिकणे

गट नंबर ५ मांडकी, जवळार्जुन गटातून शांताराम कापरे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तसेच “ब” वर्ग सहकारी बिगर उत्पादक संस्था या विभागातून दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

सदर उमेदवारास १३ सप्टेंबर २००२ नंतर तिसरे आपत्य असून ते या निवडणूक संस्थेची निवडणूक लढविण्यास अपात्र आहे. तीन अपत्य असून निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार १३ सप्टेंबर २००२ नंतर तिसरे अपत्य असेल तर उमेदवारास निवडणूक लढविण्यास अपात्र असतो. त्या निर्णयानुसार सदरील उमेदवार हे निवडणूक लढविण्यास अपात्र आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *