पुणे
सुप्रिया सुळे यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तर त्यांनाही राज्य सरकार लाडकी बहिण योजनेचे पंधराशे रुपये देईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजना बंद पाडेल. शेतकऱ्यांना मोफत मिळणारी वीज बंद पाडतील”, असे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री अनिल पाटील म्हणाले. ते नंदुरबारमध्ये बोलत होते.
यावेळी अनिल पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. अनिल पाटील म्हणाले, सरकार महिलांना लाच देत नसून भाऊबीजेची ओवाळणी देत आहे. उद्धव ठाकरे यांना बहिणीला दिलेली ओवाळणीला लाच म्हणून ते तमाम महाराष्ट्रातील महिलांचा अपमान करत आहे, शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला.
मात्र, आघाडी सरकार आल्यानंतर तो मागे घेण्याचा निर्णय घेतला जाईल. राज्यातला शेतकरी असेल युवक असेल, युवती असतील महिला असतील हेच सरकार परत आणण्यासाठी जबाबदारीने काम करतील.