सासवड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखल;एका राष्ट्रीय पक्षाच्या महिला कार्यकर्तिकडे फोनवरून केलेली शरीर सुखाची मागणी

सासवड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखल;एका राष्ट्रीय पक्षाच्या महिला कार्यकर्तिकडे फोनवरून केलेली शरीर सुखाची मागणी

पुणे

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राहिलेल्या मोहन वांडेकर यांच्यावर जेजुरी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका राष्ट्र पक्षाची जेजुरी येथील महिला कार्यकर्ता असलेल्या महिलेने याबाबत दिली असून वांडेकर यांनी त्यांच्याकडे सुखाची मागणी केली होती.

याबाबत त्यांनी जेजुरी पोलिसात वांडेकर यांचे विरोधात फिर्याद दिली आहे.दिनांक 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजलेच्या सुमारास वांडेकर यांनी फोन करून या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली . त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे वक्तव्य केले.

यानंतर त्यांनी याबाबतची माहिती त्यांच्या पतीला दिली आणि यानंतर दिनांक 4 फेब्रुवारी रोजी जेजुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबतचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *