सावधान !!!!!        पुरंदर तालुक्यातील “या” गावात झाली घरफोडी ; तब्बल साडे पाच लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरांनी केली लंपास

सावधान !!!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावात झाली घरफोडी ; तब्बल साडे पाच लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरांनी केली लंपास

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील वाघापूर येथे घरफोडी  करून तब्बल ५ लाख ४४ हजार ९०० रुपयांचे  दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली असून  पंढरीनाथ रघुनाथ चव्हाण वय 61 वर्षे धंदा शेती रा वाघापूर तालुका पुरंदर जि पुणे यांनी जेजूरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे . 

याबाबतीत जेजूरी पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार 27/4/2022 रोजी रात्री 10:00 नंतर 28/4/2022 वा चे 03:00 ते 03:30 वा चे दरम्यान मौजे वाघापूर ता पुरंदर जि पुणे फिर्यादी हे रात्री घरी झोपले असताना त्यांच्या घराची कडी खिडकीतून कोणीतरी अज्ञात चोरट्याने उघडून घरातील 1)1,00,000  रुपये किमतीचे सव्वा दोन तोळे वजनाची गळ्यातील सोन्याची चैन वजन सव्वा दोन तोळे,2)90,000  किमतीचे  सोन्याचे गंठण  वजन दोन तोळे 3)55000 किमतीचे  सोन्याचे गंठण वजन एक तोळे 4)1,00,000  किमतीचे  गळ्यातील सोन्याचे गंठण वजन अडीच तोळे 5)12000 किमतीचे  सोन्याची अंगठी वजन दोन ग्रॅम 370 मिली 6)4400  किमतीचे  आपल्या गळ्यातील सोन्याचा बदाम वजन 870 मिलि 7)25,500  किमतीचे मिनी गंठण सोन्याचे वजन अर्धा तोळे 8)10,000  किमतीचे एक चांदीचे ब्रेसलेट व चांदीच्या पट्ट्यांचे दोन जोड 9)40,000 रुपये रोख रक्कम 10)3,000 किमतीचे  पाच ते सहा साड्या 11)1,05,000  किमतीचे अडीच तोळे वजनाचे मिनी गंठण असा एकूण रक्कम  5,44,900 किमतीचा मुद्दे माल चोरून नेला आहे तसेच गावांमधील विठ्ठल लक्ष्मण कुंजीर व सुभाष शंकर कुंजीर यांचाही अज्ञात चोरट्यांनी वरील वर्णनापैकी संमतीशिवाय घरफोडी करून माल चोरून नेला आहे म्हणून अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आला आहे.

जेजूरी पोलिसांनी  भा.द.व.क 457,380 अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक गावडे पुढील तपास करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *