सावधान !!!!                                               पुरंदर तालुक्यातील “या” गावात एकाच रात्री झाल्या चार ठिकाणी चोऱ्या; एका टुव्हिलर सहित रोख रक्कम लंपास

सावधान !!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावात एकाच रात्री झाल्या चार ठिकाणी चोऱ्या; एका टुव्हिलर सहित रोख रक्कम लंपास

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात असणाऱ्या टेकवडी या गावात एकाच रात्रीत चार ठिकाणी चो-या झाल्याचा प्रकार घडला आहे.एका दोन चाकी गाडी सहित रोख रक्कम चोरीला गेल्याचे समजण्यात आले आहे.

एम एच बारा जी एच 45 21 ही निळ्या रंगाची स्प्लेंडर रात्री बारा ते दोन या वेळेत चोरीला गेल्याचे कळाले आहे.
तर एका घराचे कुलुप कटरने तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे दिसत आहे.

एका घरातील रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली तसेच एका घरातील कपाट अस्ताव्यस्त करून चोर तिथून पसार झाले आहेत. सदर प्रकार हा रात्रीच्या वेळेस घडला आहे.

सध्या शेतात रात्रपाळी ची लाईट असल्यामुळे शेतकरी हा शेतात दरवाजाला कुलूप लावून भिजवण्यासाठी जात असताना हा प्रकार घडताना दिसत आहे.

सदर प्रकारामुळे सध्या गावात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासनाकडून गावात तसेच वाड्या वस्त्यांवर पेट्रोलिंग कार फिरवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *