पुरंदर
पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे इको गाडीचा सायलन्सरचा किमती पार्ट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
याबाबत सासवड पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. सासवड पोलिसांनी याबाबत भारतीय दंड विधान कलम ३७९ नुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे राहणारे जयसिंग शिवाजी भिसे यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
दिनांक २२/०१/२०२२ रोजी रात्रो ०८.०० वा. ते ता.२३/०१/२०२२ रोजी सकाळी ०६.३० वा.चे दरम्यान मौजे भिवरी व बोपगाव येथे घरासमोर पार्किगला लावलेल्या इको कारच्या सायलंन्सर मधील किमती पार्ट कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. दोन गाड्यांचा मिळून ७८०००/- रू किंमतीचे पार्ट चोरीला गेले आहेत.
याबाबतचा अधिक तपास सासवडचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस नाईक लाटणे करीत आहेत.