सार्थ अकॕडमीचा छञपती संभाजी महाराज आदर्श सेवा पुरस्कार बालाजी भैय्या जाधव यांना तर आदर्श शिक्षक पुरस्कार सोपान चव्हाण यांना प्रदान

सार्थ अकॕडमीचा छञपती संभाजी महाराज आदर्श सेवा पुरस्कार बालाजी भैय्या जाधव यांना तर आदर्श शिक्षक पुरस्कार सोपान चव्हाण यांना प्रदान

लातुर

लातुर येथील सार्थ अकॕडमी च्या वतीने दिला जाणारा यंदाचा छञपती संभाजी महाराज आदर्शसेवा पुरस्कार राजमाता बहुउद्देशीय सेवा भावी संस्था व रक्तदान हेच जीवनदान ग्रुपचे अध्यक्ष बालाजी भैय्या जाधव यांना तर आदर्श शिक्षक पुरस्कार सोपान चव्हाण सर यांनाआणि शालेय विद्यार्थ्यांचा प्रथम ,व्दितीय पुरस्कार ,सन्मानचिन्ह व पदक देऊन सन्मानित करण्यात आले सार्थ अकॕडमी च्या ५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून लातुर येथील गजानन काॕलनी रेल्वे गेट कळंब रोड येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अशोकराव सोनवणे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून अॕड. गणेश भैय्या गोमचाळे (नगर सेवक ) उपस्थित होते.

तसेच या वेळी चंद्रकांत खटके ,कालिदास खोबरे ,अनिल चिकटे ,दिलीप दादा चिकटे, ईश्वर अप्पा बुलबुले ,प्रतिन पोटभारे, ज्ञानेश्वर चिकटे ,बाबासाहेब सोनवणे ,सोहम इगवे , विद्यार्थ्यांचे बहुसंख्येने पालक आदि मान्यवर उपस्थित होते हा पुरस्कार या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.

शेवटी सार्थ अकॕडमी संस्थेचे चालक देवमाने सर यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *