सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र मार्फत जामनेर तालुक्यातील सरपंचांना सभासद नियुक्ती पत्र वाटप नियोजन बैठकित अनेक समस्यांवर चर्चा

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र मार्फत जामनेर तालुक्यातील सरपंचांना सभासद नियुक्ती पत्र वाटप नियोजन बैठकित अनेक समस्यांवर चर्चा

जामनेर

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विविधांगी विकास साधण्यासाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ही परिषद कार्यरत आहे या परिषदेच्या माध्यमातून दिनांक 31 रोजी जामनेर पंचायत समितीच्या सभागृहा मध्ये नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तालुक्यातील सरपंच उपसरपंच व सदस्यांना सभासद नोंदणी पत्राचे देखील वाटप करण्यात आले सदरचे पत्र हे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री दत्ताभाऊ काकडे प्रदेश सरचिटणीस विकास जाधव व राज्यविश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

या कार्यक्रमात तालुका समन्वयक श्रीकांत पाटील सामरोद यांनी तालुक्यातील सरपंचांना परिषदे विषयीचे ध्येय धोरणे व कार्य याबद्दल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती गटविकास अधिकारी श्रीमती कवडदेवी मॅडम तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी श्री के बी पाटील यांनी या कार्यक्रमात 15 वा वित्त आयोग संदर्भात मार्गदर्शन केले तसेच तालुक्यातील सरपंच विनोद भाऊ चौधरी चिंचोली पिंपरी ,राजपाल भागवत लोंढरी , रामेश्वर पाटील पहुर पेठ आदी सरपंच यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा समन्वयक युवराज पाटील यांनी सरपंचांना येणाऱ्या अडचणी आणि विकास काम संदर्भात अधिकारी आणि सरपंच यांचा समनवय असावा असे म्हटले तर सरपंच परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सरपंच यांचे मजबूत संघटन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचा विश्वास बाळू धुमाळ यांनी व्यक्त केला.

गटविकास अधिकारी श्रीमती कवडदेवी मॅडम गटविकास अधिकारी, के बी पाटील तालुका समन्वयक श्रीकांत पाटील, विनोद चौधरी ,बाळू चव्हाण तालुक्यातून आलेले सर्व महिला सरपंच व सरपंच उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत पाटील यांनी केले तर आभार युवराज पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *