समाजातील शेवटचा माणुस केंद्रबिंदु माणुन त्यापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील : कैलास जगताप

समाजातील शेवटचा माणुस केंद्रबिंदु माणुन त्यापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील : कैलास जगताप

पुरंदर

तीन डिसेंबर मराठी पत्रकार संघ यांच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने बेलसर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्वच पत्रकार मित्रांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या आरोग्य शिबिराचे संयोजन मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे,उपाध्यक्ष‌ प्रवीन नवले,सचिव अमोल बनकर,सहसचिव मंगेश गायकवाड,कोषाध्यक्ष निलेश भुजबळ यांनी व नियोजन प्रभात पेपरचे पत्रकार व कार्य.सदस्य निखिलजी जगताप यांनी केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनील तात्या धिवार,मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी लोनकर,कार्यकारिणी सदस्य राजू शिंदे,सकाळ पेपरचे नाना भोंगळे,डॉ.गणेश पवार,डॉ.महेश पवार व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्टाफ आणि तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्र सूर्योदय हॉस्पिटल शिवरी व डोळ्यांचे एच व्ही देसाई हॉस्पिटल महमदवाडी हडपसर यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी तालुक्यातील 25 गावांमध्ये नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तळागाळातील नागरिकांची नेत्र तपासणी करून या नागरिकांना मोफत औषध उपचार व नागरिकांचे एच व्ही देसाई डोळ्यांचे हॉस्पिटल या ठिकाणी मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करून आणल्या बद्दल पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने कैलास जगताप यांचा आरोग्यदूत म्हणून विशेष सत्कार करण्यात आला.

मराठी पत्रकार संघाने केलेल्या कौतुकाने समाजाप्रती काम करण्याचे अजूनही मोठी शक्ती मिळाली समाजातील शेवटचा माणूस केंद्रबिंदू मानून समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पोहोचून लोकांना आरोग्य सेवा लाभ मिळुन देण्याचा प्रयत्न करेन असे प्रतिपादन पुरंदर तालुका भाजप चे सरचिटणीस कैलास जगताप यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *