संभाजी भिडेंची मिशी कापणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस,”या” माजी जिल्हाध्यक्षांची घोषणा

संभाजी भिडेंची मिशी कापणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस,”या” माजी जिल्हाध्यक्षांची घोषणा

पुणे

सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे पुन्हा एकदा बरळले आहेत. महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वातावरण तापलं आहे.

संभाजी भिडेंवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने आधीच केली आहे. तर काँग्रेस नेते यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनीही संभाजी भिडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

समता परिषदेचे माजी जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी तर संभाजी भिडेंची मिशी कापणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं आहे. संभाजी भिडे यांनी देशात अशांतता पसरवण्याचं काम सुरु केलं आहे.

भिडे हे महापुरुषांबाबत दररोज वेगवेगळे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे भिडेंची मिशी कापणाऱ्याला ओबीसी समाजाकडून वर्गणी करून एक लाखांचं बक्षिस देण्याची घोषणा नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *