संभाजी ब्रिगेडच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी संतोष हगवणे यांची निवड

संभाजी ब्रिगेडच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी संतोष हगवणे यांची निवड

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील हगवणेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक संतोष बबनराव हगवणे यांची पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
डेक्कन मराठा असोसिएशन, म्हस्के स्मारक मंदिर, टिळक रोड शुक्रवार पेठ पुणे या ठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली.


संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश कोषाध्यक्ष अमोलभैय्या काटे, प्रदेश संघटक अजयसिंह सावंत, अजय भोसले, पुणे शहर अध्यक्ष प्रशांत कुंजीर , पिंपरी चिंचवड अध्यक्ष सतीश काळे , गणेश दहिभाते उपस्थित होते.
संतोष हगवणे यांचा गेल्या १४ वर्षापासून संभाजी ब्रिगेडच्या सामाजिक चळवळीत,मराठा क्रांती मोर्चा व
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ सबंधी शेतकरी आंदोलन प्रसंगी सक्रिय सहभाग असतो.ते किल्ले पुरंदरवर छत्रपती संभाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहेत.


निवडीनंतर संतोष हगवणे म्हणाले, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून युवकांच्या आर्थिक सक्षमीकारणासाठी राबविण्यात येणारी मोहिमे अंतर्गत अहद ऑस्ट्रेलिया तहाड कॅनडा अवघा मुलुख आपला नवी दिशा नवा विचार
तसेच आरक्षणाकडून अर्थकरणाकडे याचा प्रचार पुणे जिल्यातील गावगावात करणार आहे.


शिव, फुले, शाहू, आंबेडकर या वैचारिक चळवळीचा प्रचार व प्रसार जिल्यातील सर्व भागात करणार तसेच क्रांतिकारी युवकांचे संघटन करून त्यांना चळवळीत समाविष्ट करून घेणार आहे.


२२ ऑगस्ट २०२४ रोजी संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन नवी मुंबई वाशी येथील विष्णुदास भावे येथे होणार असून सदर अधिवेशनास उपस्थित राहण्याबाबत आवाहन संतोष हगवणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *