संपूर्ण धालेवाडी गावानेच केला अवयवदानाचा आदर्श संकल्प

संपूर्ण धालेवाडी गावानेच केला अवयवदानाचा आदर्श संकल्प

मयुर कुदळे

जेजुरी प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील धालेवाडी या गावाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व युवा सारथी फाउंडेशनच्या मदतीने संपूर्ण गावात एक अनोखा आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. संपूर्ण गावानेच १३ ऑगस्ट २०२१ रोजी जागतिक अवयवदान दिन दिवसाचे औचित्य साधत मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला असून अशा प्रकारे अवयवदान करणारे हे देशातील पहिले गाव ठरणार आहे.

धालेवाडी चे विद्यमान सरपंच शरद काळाणे व चेअरमन हनुमंत (बाळासाहेब) काळाणे यांनी पुढाकार घेऊन काही दिवसापूर्वी ग्रामस्थांना आवाहन केले होते. प्रत्येक कुटुंबातून किमान एक व्यक्ती अवयवदान करेल आणि त्याला प्रतिसाद देत ९० टक्के धालेवाडी ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. लवकरच १०० टक्के अवयवदान करणारे पहिले गाव धालेवाडी असेल, असा निर्धार यावेळी काळाणे यांनी व्यक्त केला. अवयवदान हे सर्वश्रेष्ठदान आहे. त्यामुळे आम्ही या उपक्रमात सहभागी झालो असल्याचे यावेळी मुरलीधर काळाणे यांनी सांगितले.


आजपर्यंत ग्रामपंचायतने ग्रामस्थांच्या सहकार्यातून निर्मलग्राम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार, स्मार्ट ग्राम, समृद्ध ग्राम पुरस्कार असे विविध पुरस्कार ग्रामपंचायत ने मिळविलेले आहेत. गावाने १००% अवयव दान करून नवीन आदर्श निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत व युवासारथी फौंडेशन यांच्या सहकार्यातून करण्याचा संकल्प केलेला होता.


या उपक्रमासाठी युवा सारथी फाउंडेशनचे अनिल खोपडे देशमुख, अमोल दरेकर, अनुजा हनुमंत शिंदे, तनुजा रामदास ढमाळ, सारिकाखोपडे, दीप ढमाळ, धालेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच रोहिदास गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर भालेराव, सदस्या वंदना काळाणे, शशिकला साबळे, लक्ष्मीबाई कदम, अंकिता काळाणे हे मेहनत घेत आहेत. सदर उपक्रम राबवावा याचा प्रस्ताव वंदना काळाणे यांनी मांडला होता. पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी या उपक्रमाबद्दल धालेवाडीचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *