संतापजनक !!!!!   “या” लेकीचा मृतदेह वडिलांना घेऊन जावा लागला खांद्यावर

संतापजनक !!!!! “या” लेकीचा मृतदेह वडिलांना घेऊन जावा लागला खांद्यावर

बीड

जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ग्रामस्थांच्या रस्त्याविना मरणयातना सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी खराब रस्त्यामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एक दुर्दैवी आणि संतापजनक घटना गेवराईच्या भोजगावमध्ये समोर आली आहे. आत्महत्या केलेला 18 वर्षीय मुलीचा मृतदेह वडिलांना खांद्यावर घेऊन जाण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. या प्रकाराने संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील भोजगावमधील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निकीता दिनकर संत असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *